व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण

सुट्ट्यांची लाट आणि त्या पाठोपाठ वाहनांचीही लाट एकाचवेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आली. आणि सगळाच घोळ झाला. वाहतूक कोंडीने प्रत्येकाच्याच प्लॅनची पुरती वाट लावली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
mumbai-pune-highway-news

Photo Courtesy : Team Dainik Maval


हक्काचा वीकएंड शनिवार, रविवार आणि नाताळ ( christmas ) सणाचा सोमवार, अशा सलग सुट्ट्यांमुळे नोकरदार वर्ग भलताच खूश झाला होता. सलग तीन दिवस मिळालेल्या सुट्ट्यांच्या गिफ्टमुळे नववर्षाच्या स्वागताचीही मजा याचवेळी घ्यायची, असा प्लॅन अनेकांनी बनवला होता. त्यामुळे घरदार सोडून तीन दिवस निसर्गाच्या सानिध्यात कुठे तरी जावं या विचाराने घाटाखालची जनता घाटावर आणि घाटवरील जनता घाटाखाली जायचा बेत आखून मार्गस्थ झाली. पण हा असा प्लॅन करणाऱ्यांची संख्या इतक्या पटींने होती की सुट्ट्यांची लाट आणि त्या पाठोपाठ वाहनांचीही लाट एकाचवेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( mumbai pune expressway ) आली. आणि सगळाच घोळ झाला. वाहतूक कोंडीने प्रत्येकाच्याच प्लॅनची पुरती वाट लावली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

tata tiago ads may 2025

शनिवारी (दि. 23 डिसेंबर) जुन्या नव्या अशा सर्वच मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडी ( traffic jam ) झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळा (lonavala ) खोपोली (khopoli ) ही दोन तोंडावरची दोन शहरे तर दिवसभर वाहनांच्या पाँम-पाँम आवाजाने बेजार झाली होती. तिथल्या गल्ली बोळातही गाड्या शिरत होत्या. तर दुसरीकडे खंडाळा घाटातील ( khandala ) अनेक स्पॉट वाहतूक कोंडीने खच्चाखच भरले होते. सायमाळ, शिंग्रोबा मंदीर, वाय पॉइंट, सर्व्हिस पॉइंट अशा ठिकाणी तुफान वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तासंतास प्रवासी वाहनात अडकून होते. यात वाहनांच्या क्लच प्लेट निकामी होणे, प्रवासी वाहन अडकने, बेशिस्त वाहनचालकांनी वाहने वाकडीतिकडी चालवणे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गहरी बनली.

  • महामार्गावरील वाहतूक यंत्रणा, पोलिस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि अन्य सामाजिक सेवा संस्थानी या परिस्थितीत सुयोग्य नियोजन केले होते. परंतू वाहनांची संख्या वाढल्याने संबंधित यंत्रणांचीही दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. तरीही जागोजागी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी दिवसभर उन डोक्यावर घेत ते रात्रीच्या गडद अंधारात ही यंत्रणा काम करत होती. वाहतूक कोंडी मिटवण्यासोबतच प्रवाशांना पाणी अन्नाचीही मदत ही सर्व लोकं करत होती. हे सर्व चित्र या ट्रॅफिक जॅमच्या संकटात तोंडावर समाधान आणणारं होतं.

रविवारीही (दि. 24 डिसेंबर) सकाळच्या सत्रात महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मॅकेनिकल पॉइंट भागात ऑईल लिकेजमुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली होती. परंतू, मदत यंत्रणा प्रत्यक्ष ठिकाणी वेळेत पोहोचून त्यांनी रस्ता स्वच्छ करुन वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. एकंदरित पुढील दोन दिवस ते तीन दिवस महामार्गावर हे वाहतूक कोंडीचे संकट असेच कायम राहणार, असे चित्र दिसत आहे. ( christmas weekend consecutive holidays traffic jam in lonavala khandala borghat area on mumbai pune highway )

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती
– पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे
– मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा! 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार, अंतरवाली सराटीपासून पायी चालत जाणार


dainik maval ads may 2025

Previous Post

‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना

Next Post

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vaksai-grampanchayat-election

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maruti Sale appointed as Maval Taluka Agriculture Officer

Maruti Sale : मावळ तालुक्याला मिळाले नवीन कृषी अधिकारी ! Maval News

June 6, 2025
World Environment Day mahogany trees planted in Sant Tukaram Sugar Factory premises Maval

जागतिक पर्यावरण दिन : संत तुकाराम साखर कारखाना परिसरात साडेतीनशे महोगनी झाडांची लागवड । Maval News

June 6, 2025
Indian-Railway

वडगाव मावळ : एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू । Vadgaon Maval

June 6, 2025
Tree plantation on occasion of World Environment Day by Vadgaon Maval Mahavitaran Sub Division

वडगाव मावळ महावितरण उपविभागाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण । Vadgaon Maval

June 6, 2025
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News

June 6, 2025
Terrible accident between two-wheeler and pickup in Lonavala Local youth dies

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात ! स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू । Lonavala News

June 6, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.