मावळ लोकसभा मतदारसंघातील तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 मध्ये लॉटरीत घर जिंकलेल्या चार हजार लाभार्थ्यांना लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. वाढीव रक्कम देखील कमी केली जाणार असून लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लॉटरीमध्ये घर लागलेल्या लाभार्थ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत बैठक घेतली. डिग्गीकर यांनी तातडीने घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले, यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते. (CIDCO Beneficiaries Will Get Possession of their Houses Soon in Taloja Said Maval MP Shrirang Barne)
सिडकोच्या लॉटरीत 2019 मध्ये चार हजार लाभार्थ्यांना घर मिळाले. परंतु, या नागरिकांना अद्याप ताबा मिळाला नाही. सदनिकेच्या ताब्यासाठी दिर्घकाळापासून ते वाट पाहत आहेत. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सिडकोच्या माहिती पुस्तकात 31 मे 2022 व काही काळानंतर मे 2024 मध्ये ताबा देण्यात येईल अशी नोंद आहे. त्यानंतर रस्त्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर ताबा दिला जाईल असे लाभार्थ्यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. परंतु, आजतागायत रस्त्याचे काम झाले नाही. घराचा ताबा मिळालेला नाही.
लाभार्थ्यांना बँकेच्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच घराचे भाडे असा आर्थिक भार पडत आहे. सोडतीच्यावेळी सांगितल्यापेक्षा ईडब्ल्यूएस आणि एलआयजी सदनिकेच्या किमती वाटप पत्रात वाढवून दिल्या आहेत. या दोन्ही क्षेत्रातील प्रति तीन ते पाच लाखाची वाढ करण्यात आली असून आर्थिक आव्हानात भर पडली आहे. भरमसाठ वाढ करुन भरुन घेतलेली रक्कम लाभार्थ्यांना पुन्हा मिळावी. विलंब करुन प्रतिदिवसाच्या आकारलेल्या दंडाची नुकसान भरपाई देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल । Mumbai Pune Expressway News
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval
– लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News