Dainik Maval News : किवळे येथे भाजी मार्केट मध्ये भाजीपाला खरेदी करीत असलेल्या पालकांसोबत असलेल्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागीना चोरणाऱ्या चोरट्यास बाजारातील नागरिकांनी आणि गस्तीवरील पोलिसांनी रंगेहात पकडले. कैलास शामराव खाडे ( वय २६ वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक रा. साने चौक, भिमशक्ती नगर निगडी) असे आरोपीचे नाव असून आरोपी अटकेत आहे.
याप्रकरणी दत्तात्रय रामदार बेलकर ( वय ४१ वर्ष, व्यवसाय नोकरी रा. भिमाशंकर नगर कॉलनी नं ०२ आर्दशनगर किवळे ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १४ ऑक्टोबर ) रोजी सायंकाळी ६.४५ वा चे दरम्यान किवळे येथील के.व्हीला सोसायटी समोरील भाजीपाला मार्केट येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची पत्नी उज्वला ही मुलांसह भाजीपाला खरेदी करत असताना आरोपीने फिर्यादी यांचा मुलगा सार्थक याच्या गळ्यातील २५,००० रुपये किंमतीचे काळ्या दो-यात गाठलेले सोन्याचे बदाम हे हिसकावुन चोरी करुन पळुन जाणाऱ्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाजारातील लोकांनी व गस्त करत असणा-या पोलिसांनी आरोपीला रंगेहात पडकले. पोउपनि वाव्हळे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा