मागील आठवड्यात रेल्वेकडून पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला. यात लोणावळा ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासह खडकी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे खडकी स्थानकावर सिग्नलमध्ये होणारे बिघाड आता होणार नाही. शिवाय स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे एकाच सेक्शनमधून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे गाड्यांना आता लूप लाइनवर थांबावे लागणार नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळच्या वाचकांकडून याबाबत काही प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यात रेल्वे विभाग या मार्गावर स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही? असे प्रश्व विचारत आहे. ( Citizens demand for independent route for Pune Lonavla local )
- दैनिक मावळ । वाचकांच्या प्रतिक्रिया – प्रकाश वा. दातार (तळेगाव दाभाडे)
रेल्वे प्रशासन पुणे – लोणावळा टप्प्यातील लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा विचार का करत नाही. हा टप्पा दुर्लक्षित असण्याचे काही राजकारण आहे का? तेच समजत नाही. पुणे-तळेगाव-लोणावळा परिसर औद्योगिकदृष्ट्या इतका विकसित होण्यात ह्या लोकल्स दिवसभर धावल्या तर निश्चित भर घालेल. परंतू, रेल्वे प्रशासन तसेच राज्य सरकार ह्या समस्येला दुजाभावाने पाहत आहे. सापत्नपणे पाहत आहे. लोकल्स दिवसभर धावल्या तर विद्यार्थी, अपंग नागरिक आणि विद्यार्थी, नोकरदार वर्ग ह्या सर्वांना सोईचे होणारे आहे. सर्व थरातील प्रवाशांना वेळेवर प्रवास होण्यास मदत होईल. सध्या विद्यार्थ्यांचे घरी उशीरा पोहोचण्याने अभ्यासाचे पण नुकसान होते. त्यांना लोकल्सची वाट पाहत तासंतास् उभे राहावे लागते. त्यामुळे थकवा येतो. तरीही ह्या परिसराचा विकास हा ह्या लोकल्स दिवसभर नियमित धावल्या तर शक्य आहे. हे संबंधितांनी लक्षात घेऊन तशी कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.” – प्रकाश वा. दातार (तळेगाव दाभाडे)
अधिक वाचा –
– कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही
– कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा