आपल्याला शिक्षण किंवा इतर शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीकडून अनेकदा काही दाखल्यांची आवश्यकता असतो. परंतू ग्रामपंचायतीकडून कोणकोणते दाखले मिळतात, हे तुम्हाला माहितीये का? आपली ग्रामपंचायत कोणकोणते दाखले / प्रमाणपत्र देते, याची माहिती प्रत्येक ग्रामस्थाला असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क लागते आणि किती कालावधीत तो दाखला मिळतो, हेही माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात आपण हि सर्व माहिती जाणून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – २०१५ च्या कलम ३ अन्वये ग्रामपंचायत मार्फत द्यावयाच्या सेवा खालीलप्रमाणे;
1. जन्म नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
2. मृत्यू नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
3. विवाह नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
4. रहिवाशी दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
5. दारिद्य रेषेखालील दाखला – निःशुल्क
6. हयातीचा दाखला – निःशुल्क
7. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
8. शौचालय दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
9. नमुना न ८ उतारा – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
10. निराधार असल्याचा दाखला – निःशुल्क (सेवा कालावधी 20 दिवस)
11. विधवा असल्याचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस
12. परित्यक्ता असल्याचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस
13. विभक्त कुटुंबाचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस
ग्रामपंचायतीतील दाखले व शुल्क
दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क
जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना ८ अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला २० रू
दाखल्यांच्या शुल्काचा फलक दर्शनी भागात लावण्याचा नियम आहे pic.twitter.com/5UtryZiTDq
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 29, 2023
नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत दाखल्यांच्या शुल्काचा हा फलक दर्शनी भागात लावणे आवश्य आहे. ग्रामपंचायतीमध्ये मिळणाऱ्या विविध दाखल्यांत दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क मिळतो. तर, जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला घेण्यासाठी 20 रूपये शुल्काचा नियम आहे. ( Certificates received by citizens from Gram Panchayat know Service Duration and Fee Information )
अधिक वाचा –
– राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…
– काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!
– रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या