मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवार (दि. 29 नोव्हेंबर) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने तातडीने एकत्रित पंचनामे सादरीकरणाचे आदेश दिले आहेत. तसेच इतरही अनेक महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिंदे सरकार मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे ;
- अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
- झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात 50 टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
- राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात 478 शाळा
- मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
- औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
- ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – 2023’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
- शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 1 जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2023
अवकाळीग्रस्त भागात तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री
गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्दरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या. ( damaged farmers will get help maharashtra cabinet meeting decision november 2023 )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…
– काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!