वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साइटवरील लोखंडे सळया चोरल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. दिनांक 26 तारखेला तळेगाव स्टेशन परिसरातील सीटी पॅलेजा बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून 3 जण फरार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
चंद्रबहादूर तिलक दमाई (वय 48 रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादवी 352, 506, 34 सह शस्त्र अधिनियम कलम 4 (24) अन्वये गुन्हा दाखल केला असून फिर्यादीवरून संदीप गोविंद राठोड (वय 24) याला अटक केली आहे. तर त्याचे तीन साथीदार मात्र फरार झाले आहेत. ( Theft of iron from a construction site Incident in Talegaon Dabhade )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन परिसरात सिटी पॅलेजा नावाच्या बिल्डिंग येथे रात्री आरोपी आले यावेळी फिर्यादी तिथे झोपले होते. त्यांना आवाजाने जाग आली असता आरोपीने त्यांना कोयता दाखवून शांत राहण्यास सांगितले व जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या डोळ्यासमोर बांधकाम साइटवरून 47 हजार 600 रुपयांच्या लोखंडी सळया टेम्पोमध्ये टाकून चोरून नेल्या. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे एका आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र तीन साथीदार फरार आहेत. पोउपनि जगदाळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!
– रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या
– मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा