व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या

आपल्या देशात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. स्वस्त दरात धान्य मिळवणे फक्त यापुरताच याचा उपयोग मर्यादीत नसून इतरही अनेक सरकारी कामात रेशन कार्ड उपयोगास येतं.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 28, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Fair-Price-Ration-Shop

File Image


आपल्या देशात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. स्वस्त दरात धान्य मिळवणे फक्त यापुरताच याचा उपयोग मर्यादीत नसून इतरही अनेक सरकारी कामात रेशन कार्ड उपयोगास येतं. सरकार आपल्या देशातील गरीब गरजू जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देत आहे. देशभरात असलेल्या रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून हे वितरण होत असतं. परंतू, अनेकदा हे वितरक रेशन कार्डधारकांना धान्य देताना गडबड करतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दुकानदार धान्य कमी देणे, धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे असे प्रताप करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जातो. परंतू आता सामन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे, जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य मिळवत असताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुम्ही याबाबत थेट ऑनलाईन तक्रार करु शकता. ( ration card complaint helpline number website maharashtra state )

रेशन कार्ड हे अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवले जाते. मात्र काही रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकले जाते, असेही प्रताप घडतात. ह्या अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना सामान्यांना करावा लागत असल्याने सरकारने एक ठोस पाऊल उचलले आहे.

सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही जर रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा डीलर विरोधात तक्रार असेल, नवीन रेशनकार्डसाठी अडचण निर्माण करत असेल, किंवा अनावश्यक पैशांची मागणी करत असल्यास चिंता करायचे कारण नाही. तुम्ही सरकारच्या टोल-फ्री क्रमांकावर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करु शकता. ज्या तक्रारीची दखल थेट तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन कार्यवाही होईल. तसेच सरकारच्या वेबसाईटवरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

महाराष्ट्रात रेशन कार्ड संबंधित तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक – 1967 / 1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

अधिक वाचा –
– भाजे गावातील ‘त्या’ चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत
– मावळात ‘अवकाळीने’ अनेकांचे नुकसान, सरसकट सर्वांच्याच नुकसानीचे पंचनामे करा; खासदार बारणेंचे तहसीलदारांना पत्र
– मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा

Next Post

काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Resignation

काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.