मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक कार्ड म्हणूनही ओळखले जाते. तसेच इतर अनेक कारणांसाठी जसे की चेहरा ओळख, पत्ता आणि वयाचा पुरावा म्हणून देखील काम करते. देशात सतत कुठल्यातरी निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असते. अशात तुमच्या भागात आगामी काळात निवडणूकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अद्यापही मतदार ओळखपत्र तयार करणे ही बाब नागरिकांना वेळखाऊ आणि किचकट वाटते. परंतू, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. याचे कारण, मतदान कार्डसंबंधित नवीन नोंदणी, स्थलांतर, दुरुस्ती, फोटो बदल, मोबाईल-ईमेल आयडी लिंक, कार्ड हरवले / खराब झाल्यास नवीनसाठी अर्ज, कार्ड PDF डाऊनलोड करणे सर्व सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसेच महत्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधा निशुल्क आहे. त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईव प्रकियेतून तुमच्या मतदार ओळखपत्राची सर्व कामे करू शकता. तसेच, मोबाईल लिंक असल्यास रंगीत मतदान कार्ड देखील डाऊनलोड करता येऊ शकतं.
मतदार ओळखपत्र संबंधित कामासाठी समोरील लिंकवर क्लिक करा – https://voters.eci.gov.in/login
मतदार ओळखपत्र हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) असेही म्हणतात. हे अत्यावश्यक ओळखपत्र म्हणूनही काम करते. पण, अनेक वेळा मतदार ओळखपत्रावर मतदाराचे चुकीचे नाव छापले जाते. ज्यामुळे नंतर समस्या येतात. तुमच्या मतदार कार्डावरही चुकीचे नाव असल्यास, तुम्ही वरील पोर्टलवर ते सहज दुरुस्त करू शकता.
मतदान कार्ड
नवीन नोंदणी, स्थलांतर, दुरुस्ती, फोटो बदल, मोबाईल-ईमेल आयडी लिंक, कार्ड हरवले / खराब झाल्यास नवीनसाठी अर्ज, कार्ड PDF डाऊनलोड करणे सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध.
सर्व सुविधा निःशुल्क
मोबाईल लिंक असल्यास रंगीत मतदान कार्ड डाऊनलोड करता येईल.https://t.co/ke6eDsOA8j
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 27, 2023
असे करा लॉगिन –
सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर येथे दर्शविलेल्या वोटर पोर्टलवर क्लिक करा. आता तुम्हाला (https://voterportal.eci.gov.in/) वर पुनर्निर्देशित केले जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट मतदार पोर्टलवरही जाऊ शकता. नंतर पोर्टलवर तुमचे नाव आणि पासवर्डसह नोंदणी करा. तुम्ही आधीच सदस्य असाल तर लॉगिन करा. यानंतर Correction in Voter Id हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली दुरुस्ती करा. ( make your new voter id card or edit and download polling cards Learn online process )
अधिक वाचा –
– Breaking! मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात
– मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade
– लोणावळा पोलिस ॲक्शन मोडवर! वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 60 पेक्षा अधिक व्यावसायिकांवर कारवाई