लोणावळा शहरातील पोलिस प्रशासन मागील काही दिवसांपासून एक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात शहरात नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिस प्रशासनाने टपरी व हातगाडी धारक, रहदारीला अडथळा ठरतील अशी वाहने उभी करणारे वाहन चालक, रस्त्यावर दुकानांच्या पाट्या लावणारे व्यवसायिक यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी लोणावळा बाजार भाग आणि मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई रित्या 63 जणांवर कारवाई करत सुमारे 50 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परिवहन विभाग लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलीस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्रमांर 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर कारवाई करण्यात आली. तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या कडेला लावण्यात येणाऱ्या फळे व खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणारे चालकांवर एकूण 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Action by Lonavala city police on mumbai pune highway adjacent businessmen )
अधिक वाचा –
– भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक
– कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
– वडगावच्या शैलेश वहिलेंचा प्रामाणिकपणा; सापडलेली कागदपत्रे मुळ मालकाला शोधून दिली परत