पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण – अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग – सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयात डीबी पथकाची मिटींग घेऊन घरफोडी चोरी उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीमध्ये मौजे भाजे (ता मावळ जि पुणे) येथील ओमसाई नावाचे गॅरेज मधून मोटार सायकलचे ब्लॉक पिस्टन, लायनर, चैन किट, फोर व्हिलरचे क्लच प्लेट, ब्रेक डिक्स असा एकूण 16,050 रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेल्याची तक्रार 23 नोव्हेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडे दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया या पथकाने मौजे भाजे, मळवली, कार्ला या भागात गस्त घालून तसेच बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयीत इसम नामे संदीप भानुदास जाधव (वय 41, रा. लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ, लोणावळा; मुळ रा. टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कस्टडी दिली असता कस्टडी दरम्यान गुन्ह्यामध्ये गेलेला 16050 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोहवा नितीन कदम हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. ( lonavala rural police arrested thief within 2 hours )
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण – अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक – मितेश घट्टे, व सहा. पोलीस अधीक्षक – सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया यांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली.
अधिक वाचा –
– वडगाव शहरात मंगळवारपासून कार्तिक उत्सव, हभप तुषार महाराज दळवी करणार कथेचे निरूपण
– तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर
– Breaking! मावळ तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! वडगाव भागात अतिमुसळधार पाऊस, भात उत्पादक शेतकरी संकटात