भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, तसेच विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे आणि प्रमुख नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची तळेगाव दाभाडे शहराची नवीन कार्यकारिणी नवनियुक्त शहर अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी नुकतीच जाहीर केली होती. या नवपदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती पत्राचे शनिवारी वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुका अध्यक्ष दत्तात्रेय गुंड, विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, प्रदेश किसान मोर्चा माजी सचिव संतोष दाभाडे, प्रदेश भाजप ओबीसी सदस्य सोमनाथ जांभुळकर, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी गटनेते अरुण भेगडे, जेष्ठ भाजपा नेते रविनाना दाभाडे, सचिन टकले, राजाराम दगडे, अर्जुन पवार, संजय जाधव, शोभा भेगडे, राजनी ठाकूर यांच्यासह शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Maval Bharatiya Janata Party Talegaon Dabhade New Executive Body Announced )
सोमवारी तालुका कार्यकारिणी होणार जाहीर –
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज, सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. पक्षाच्या वडगाव मावळ येथील मध्यवर्ती कार्यालयात दुपारी 12 वाजता ही नूतन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. अशी माहिती भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिली.
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिस ॲक्शन मोडवर! वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 60 पेक्षा अधिक व्यावसायिकांवर कारवाई
– भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका, घरबसल्या ‘असा’ करा भाडे करार
– जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार