ठाकूरसाई (पवनानगर) : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी पर्यटन पंढरी समजल्या जाणार्या पवन मावळ भागातील टेंट व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना येणार्या अनेक समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित अनेक व्यावसायिकांनी विविध समस्यां मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वीज कनेक्शन, ध्वनी प्रदुषण, सांडपाणी, रस्ते, दळणवळण, आणि पुरविल्या जाणार्या इतर सर्व सेवा आदी तक्रारी केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बाळा भेगडे यांनी उपस्थितांच्या सर्व समस्या ऐकल्या., त्यानंतर सर्वांनी रीतसर वीज जोडणी करून घ्यावी, आपण वीज महावितरण कडून थोडा कालावधी मागून घेऊ. जेणेकरून सर्वांचे रितसर वीज कनेक्शन होउन जाईल. सांडपाण्याची व्यवस्था सगळ्यांची ठीक आहे. परंतु ज्यांची कोणाची नाहीये त्यांनी त्वरित सांडपाण्याची व्यवस्था आपल्या जागेत शोष खड्डे घेऊन करावी. तसेच, बोलत असताना बाळा भेगडे यांनी सदरचा व्यावसाय हा अधिकृत करण्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलने चालू असल्याचेही सांगितले.
“माझ्या धरणग्रस्त व्यावसायिक बांधवांसाठी मी कायम एक पाउल पुढे आहे. जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे हाक द्या तुमच्या हाकेला मी लगेचच उपस्थित असेल. परंतु पवना धरणाचे पाणी हे तुमच्यासह मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड चे लोक देखील हेच पाणी पीत असल्यामुळे त्याचे प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्या” – बाळा भेगडे
मावळ तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित झाल्याने स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. याचा पुरेपूर फायदा घेण्याचे ही सांगितले. बोलत असताना त्यांनी स्वतः देखील एक शाकाहारी हॉटेल कसे चालविले हे देखील आवर्जून सांगितले. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना नवीन ऊर्जा मिळाली. किसन खैरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर बाळासाहेब मोहोळ यांनी सर्वांचे आभार मानले. ( Former Minister of State Bala Bhegde met Pavana tent businessmen Maval )
यावेळी भाजपा मावळचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे,नितीन मराठे, नारायण भालेराव, गणेश ठाकर, सरपंच नारायण बोडके, किसन खैरे, बाळासाहेब मोहोळ, संजय मोहोळ, भारत काळे,ज्ञानेश्वर ठाकर, निवृत्ती ठाकर, दत्ता ठाकर, प्रकाश ठाकर,माऊली आढावा, सुधीर घरदाळे,बबन ठाकर, धर्मेंद्र ठाकर, अशोक ठाकर, नवनाथ कारके, अंकुश ठाकर,गणेश मानकर, आणि इतर व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.
माहिती – पत्रकार प्रतिनिधी, धर्मेंद्र ठाकर
अधिक वाचा –
– मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम
– वडगाव शहरात मंगळवारपासून कार्तिक उत्सव, हभप तुषार महाराज दळवी करणार कथेचे निरूपण
– तळेगाव शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान; तालुक्याची नवीन कार्यकारिणी आज होणार जाहीर