Dainik Maval News : श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक (जयंती) दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास व रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरात एकूण 70 जणांची डोळे तपासणी करून त्यांना मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 176 लोकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. 120 लोकांचे हाडाचा ठिसूळपणा याची चाचणी करण्यात आली.
यासह रक्तदान शिबिरात 49 नागरिकांनी रक्तदान करून आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद दिला. मायमर मेडिकल कॉलेजचे पथक यांनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून शिबिर उत्तमरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल, विनोद राठोड, राजेंद्र शहा, इंदर सोलंकी, समीर परमार, भरत राठोड, संजय सोलंकी, निलेश जैन, घनश्याम राठोड, संजय ओसवाल, मायमर मेडिकल कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी राहुल पारगे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार
– राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News
– स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News
– वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यश, कासवांच्या पिल्लांनी पाहिले जग । Maval News