पाचाणे गावच्या सरपंचपदी निता खंडूशेठ येवले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल पाचाणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ आयोजित कऱण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गावकऱ्यांनी यावेळी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा, भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र भेगडे यांचा, तर मावळ लोकसभा युवा सेना प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल विश्वजित बारणे यांचा असा तिनही मान्यवरांचा नागरी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, किरण राक्षे, बाळासाहेब घोटकुले, अभिमन्यू शिंदे यांच्यासह पाचाणे गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( civil honor of pachane gram panchayat sarpanch nita yewle )
अधिक वाचा –
– पाटण ते बोरज रस्त्यासाठी आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून 7 कोटी 60 लाखांचा निधी, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पेटला, 3 जणांचा होरपळून मृत्यू, पाहा भीषण अपघाताचा Live व्हिडिओ