‘ऐकावं ते नवलंच’ आणि ‘पुणे तिथे काय उणे’ या दोन्ही उक्तींचा संबंध हा एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असाच आहे. याचे कारण पुण्यात असे काही प्रसंग किस्से घडतात जे की ऐकणाऱ्यांसाठी ऐकावं ते नवलंच अशा पद्धतीच्या असतात. नुकतीच पुण्यात घडलेली एक घटना सर्वांसाठीच धक्कादायक ठरली. दोन कुटुंबात शुल्लक कारणावरुन डब्लूडब्लूएफ प्रमाणे फ्री स्टाईल हाणामारी झालीये आणि हे हाणामारीचे शुल्लक कारण आहे, म्हशीने घरासमोर टाकलेले शेण. ( Clash Between Two Families After Buffalo Defiled In Front Of House )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ऐकतानाही नवल वाटावं अशी ही गोष्ट आहे, पण हे खरंय. कधी पोपटाच्या आवाजाचा त्रास झाला म्हणून पोलिसांत तक्रार झालेल्या पुण्यात आता म्हशीने घरासमोर शेण टाकल्याने झालेल्या वादाची तक्रार पोलिसांकडे गेलीये. बंडगार्डन पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे.
निलेश उर्फ पिंट्या काची, चेतन रमेश काची, शैलेश रमेश काची (सर्व रा. आरटीओ कार्यालयाजवळ) यांच्याविरूद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल मल्लाव भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून हर्षल मल्लाव (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. ( Clash Between Two Families After Buffalo Defiled In Front Of House In Pune )
हर्षल मल्लाव यांच्या घरासमोर म्हशीचे शेण पडले होते. त्यामुळे त्यांनी म्हैस मालक काची कुटूंबियाला जाब विचारला. या जाब विचारण्याचे पर्यावसन पुढे शिवीगाळ करण्यात नंतर वादात आणि शेवटी हाणामारीत झाले. दोन व्यक्तींच्या भांडणात नंतर दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. यावेळी हाणामारीत कोण कुणाला मारत होते हेही कळत नव्हते.
बंडगार्डन परिसरात अनेक वर्षांपासून म्हशींचा गोठा आहे. आजवर पशूधनामुळे या ठिकाणी छोटे-मोठे वाद झालेत. मात्र, अशाप्रकारे कधीही फ्री-स्टाईल हाणामारी झाली नव्हती. त्यातही म्हशीने घरासमोर घाण केल्याच्या रागातून तुंबळ मारामारी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा –
धक्कादायक! लोणावळ्यात 15 वर्षीय मुलाला फुस लावून पळवून नेले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल I Lonavla Crime
Video: शिक्षण विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार शेळकेंचे मनोगत, सर्वांसमोर दिले ‘हे’ वचन