केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी 15 फेब्रुवारीपासून ( बुधवार ) सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. महत्वाचे म्हणजे यंदा तब्बल 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी बोर्डची परीक्षा देणार आहेत. सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत या परीक्षा पार पडतील.
सीबीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार आहेत. ( Class 10 and 12 CBSE Board Exam 2023 Will Start From 15th February )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांसाठी देशात आणि परदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. यात दहावीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे. तर, बारावीच्या परीक्षेसाठी 36 दिवस लागतील.
इयत्ता 10वीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली जाईल, तर इयत्ता 12वीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली जाईल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे. तर 12वीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रे करण्यात आली आहेत.
दहावी बोर्डाच्या परीक्षेत एकूण 12 लाख 47 हजार 364 मुले आणि 9 लाख 38 हजार 566 मुली. तर बारावीच्या परीक्षेत 9 लाख 51 हजार 332 मुले आणि 7 लाख 45 हजार 433 मुली परीक्षा देणार आहेत. पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर जेंडर विद्यार्थी देखील परीक्षेत सहभागी होतील ज्यांची संख्या दहावीसाठी 10 आणि बारावीसाठी 05 आहे. ( Class 10 and 12 CBSE Board Exam 2023 Will Start From 15th February )
अधिक वाचा –
– छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखडा मंजूर ते राज्यात पीएम श्री योजना राबवणार, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे सर्व निर्णय
– भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर महिलांच्या घोळक्याला भरधाव वाहनाची धडक, 5 महिला ठार