आज (मंगळवार, दिनांक 14 फेब्रुवारी 2023) रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ( Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Development Plan Approved Read Maharashtra State Cabinet Meeting Decision )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय ;
1. राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग)
2. धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. 1 हजार कोटी निधीस मान्यता. 5 लाख शेतकऱ्यांना लाभ (अन्न व नागरी पुरवठा विभाग)
3. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
4. महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत (सार्वजनिक आरोग्य विभाग)
5. पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे 878 कोटी खर्चास मान्यता. 7690 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार (जलसंपदा विभाग)
6. पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण
– छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397 कोटी 54 लाख खर्चाचा विकास आराखडा.
– जेजुरीसाठी 127 कोटी 27 लाखाचा विकास आराखडा
– सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींचा विकास आराखडा
तसेच, या बैठकीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले आणि राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. ( Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Development Plan Approved Read Maharashtra State Cabinet Meeting Decision )
अधिक वाचा –
– उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आण्णासाहेब दाभाडे यांना पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’
– मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल