Dainik Maval News : पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग यांच्यावतीने फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि हिरकणी शिक्षिका मैत्रीण ट्रेकिंग ग्रुप यांनी मंगळवारी लोहगड गाव आणि किल्ला परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मावळ तालुक्यातील सुमारे 70 शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी किल्ल्यावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.
सदर स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख निर्मला काळे यांनी केले. जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन देण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला आहे.
किल्ले लोहगड हा पर्यटकांकरिता वर्षभर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अभेद्य तटबंदी आणि दैदीप्यमान इतिहास असलेला लोहगड मावळ तालुक्याची शान आहे. किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी स्वच्छतेच्या माध्यमातून हातभार लावला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव शहर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणास स्थानिक व्यावसायिकांचा विरोध, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval
– मावळ तालुक्याला मिळाले नवीन गटविकास अधिकारी, के. के. प्रधान यांची मावळ पंचायत समितीत बदली । Maval News
– मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला 2024 च्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval