पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी एकविरा गड आणि कार्ला लेणी येथील स्वच्छ्ता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या अभियानाचा चौथा टप्पा भुशी डॅम इथे पार पडणार आहे.
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 3 मे रोजी किल्ले लोहगड आणि परिसर तर तिसऱ्या टप्प्यात दिनांक 10 मे रोजी टायगर पॉइंट आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भुशी डॅम भागात दिनांक 17 मे (बुधवार) रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. ( Cleanliness campaign in bhushi dam area on 17th May under campaign Warsa Swachchate Mavla Shivarayancha )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा हे अभियान पुणे ग्रामीण पोलीस दलांमार्फत पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे. सदर अभियाना दरम्यान आतापर्यंत एकविरा मंदिर आणि कार्ला लेणी परिसर, लोहगड किल्ला, टायगर पॉइंट, लायन पॉइंट भाग इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तरी वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा या अभियानादरम्यान दिनांक 17 मे रोजी सकाळी 6 वाजता भुशी डॅम इथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– कुणाला मिळणार सभापतीचा मान? 24 मे रोजी बाजार समिती सभापती पदाची निवडणूक, इच्छुकांची मोर्चेबांधणी, ‘ही’ नावे चर्चेत
– आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023