व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 16, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Pandharpur-Ashadhi-Yatra

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दिनांक २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. ( To Release 5000 Special Buses For Shri Kshetra Pandharpur Ashadhi Yatra Said CM Eknath Shinde )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा – छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, प्रत्येक शिवभक्ताला होईल आनंद, वाचा…

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार –

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

अधिक वाचा –
– उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण; शहरातील पहिल्या 3D तारांगणाचेही उद्घाटन
– छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी ‘श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा’, देवदर्शन यात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण; शहरातील पहिल्या 3D तारांगणाचेही उद्घाटन

Next Post

गड किल्ले स्वच्छता अभियानांतर्गत 17 मे रोजी भुशी डॅम परिसरात स्वच्छता मोहीम; सायबर सुरक्षा विषयावर होणार जनजागृती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Police-Cleanliness-Mission

गड किल्ले स्वच्छता अभियानांतर्गत 17 मे रोजी भुशी डॅम परिसरात स्वच्छता मोहीम; सायबर सुरक्षा विषयावर होणार जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.