मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) बैठक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कामगार बांधव आणि जनरल मोटर्स यांच्यामध्ये सामंजस्याने झालेल्या करारातील अटी-शर्तींचा विचार न करता, कामगार बांधवांची बाजू न ऐकता कामगार मंत्रालयाकडून क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्यामुळे या कामगारांवर नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवली या एक हजार कामगारांना न्याय मिळेल या भावनेने हे उपोषण सुरु आहे, अशी वस्तुस्थिती आमदार शेळके यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे सविस्तरपणे मांडली.
त्यावर “जनरल मोटर्स कंपनीने पुन्हा नव्याने अधिकची समाधानकारक भरपाई द्यावी आणि जर कामगारांना ही भरपाई मान्य नसेल तर ह्युंदाई कंपनीला नुकसानभरपाई देऊन आम्ही सरकार म्हणून कामगारांना कंपनीत सामावुन घेण्यासाठी आग्रही भुमिका घेऊ,” असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
राज्याचे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.#maval #generalmotors #employee #midc pic.twitter.com/2khNGBL9rT
— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 17, 2023
तसेच राज्य सरकारची बाजु मांडण्याकरिता उद्योग मंत्री उदय सामंत हे गुरुवारी (दि. 19 ऑक्टो) उपोषण स्थळी येऊन सर्व कामगार बांधवांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री, उद्योगमंत्री, आमदार शेळके, माजी मंत्री भेगडे, कामगार प्रतिनिधी आदी उपस्थित होते. ( CM Eknath Shinde chaired meeting regarding demands of General Motors workers at Varsha residence )
अधिक वाचा –
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर
– वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर