मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रोजेक्टच्या कामाची पाहणी केली. मिसिंग लिंक हा देशातील ऐतिहासिक प्रकल्प आहे. याद्वारे खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान बोगदा खोदला जात आहे. ज्याद्वारे मुंबई-पुणे दृतगती मार्गावरील खंडाळा घाट थेट बायपास होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या सुमारे 500 ते 600 फूट खाली बोगदा खोदला जात आहे, या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ( CM Eknath Shinde Check Progress of Mumbai Pune Missing Link Project )
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिग लिंक’ कामाची पाहणी मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. या प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या सुमारे ५०० ते ६०० फूट खाली असलेल्या बोगद्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.@MahaDGIPR pic.twitter.com/fTzFGkx3oc
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) November 10, 2022
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुख्यमंत्री @mieknathshinde आज लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. खासदार @MPShrirangBarne , रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. pic.twitter.com/PW38WMwJYE
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावेळी खासदार श्रीरंग बारणे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
( CM Eknath Shinde Check Progress of Mumbai Pune Missing Link Project )
अधिक वाचा –
मोठी बातमी! शिळींब गावात महिन्याभरात दुसरी मोठी चोरी, लाखोंचा माल लंपास, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण I Video
Video : खोपोली येथे शासनमान्य तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न