पुणे ( Pune ) महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी ( Fursungi ) आणि उरुळी देवाची ( Uruli Devachi ) या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ( Cm Eknath Shinde Declared New Municipality For Fursungi And Uruli Devachi Villages In Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज घेतला. नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. नागरी सहभागातून ही नगरपालिका सर्वोत्कृष्ट ठरेल- मुख्यमंत्री pic.twitter.com/9kdl05ZC8v
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2022
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मुलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतला. नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल- मुख्यमंत्री pic.twitter.com/TYvSE2gMf6
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 7, 2022
पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे. ही बाब लक्षात घेता, या दोन गावांना नवीन नगरपालिका देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ( Cm Eknath Shinde Declared New Municipality For Fursungi And Uruli Devachi Villages In Pune )
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी! ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा पूर्ववत होणार
– इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक घटना