मावळ तालुक्यातील सोमाटणे गावात एक थरारक प्रकार घडला आहे. सोमाटणे येथील चौराईनगरमधील एका घरात बुधवारी (दिनांक 5 जुलै) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास खोलीत झोपलेल्या महिलेच्या अंथरुणात विषारी नाग शिरला होता. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, महिला खोलीत झोपली होती. तेव्हा झोपलेल्या महिलेच्या अंगावरून साप गेला. साप अंगावरुन जाताना झोपलेल्या महिलेच्या हाताला गार आणि मऊसूद असे काहीतरी जाणवले. त्यानंतर त्यांना जाग आली, त्यांनी पतीलाही उठवले आणि बघितले तर तिथे साप असल्याचे दिसले. ( Cobra Snake Rescued At Midnight In Somatne Maval )
घरमालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना फोन करून माहिती दिली. गायकवाड यांनी लगेच तिथे जाऊन पाहिले तर फणा काढून बसलेला तो एक विषारी नाग होता. गायकवाड यांनी त्या नागाला सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या जागेत सोडून दिले. अन् अर्ध्या रात्री एका महिलेचे प्राणही वाचवले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप
– मोठी बातमी! कान्हे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू