Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील शाळा चौकातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये महिनाभर चालू असलेल्या काकड आरती सोहळ्याचा समारोप हभप रामायणाचार्य मनोहर महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.
गेली महिनाभर मंदिरात काकड आरती सोहळा दररोज पहाटे सुरू होत होता. शुक्रवारी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सोहळ्याची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली. पहाटे अभिषेक व महापूजा उद्योजक संग्राम कृष्णाजी जगताप व कल्याणी जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी काकड आरती, भजन तसेच महाआरती संपन्न झाली. त्यानंतर हभपरामायणाचार्य मनोहर महाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे किर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर अन्नदान सेवा उद्योजक संग्राम जगताप परिवाराकडून करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon