Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन अद्यावत कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी दिली.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे सहा एकर जागा आहे. त्या जागेवर कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत बांधून तयार झाली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लोकार्पणाची तारीख ठरविली जाणार असून मोठा उद्घाटन सोहळा करण्यात येणार असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.
- सदर कार्यालयाचे बांधकाम मंजूर आराखड्याप्रमाणे पूर्ण झाले असून या नवीन कार्यालयातील इमारतीमध्ये एक सभागृह तर सभापती, उपसभापती व सचिव यांचे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. गेली सहा महिन्यापासून हे काम चालू होते, डिसेंबर अखेर ते पूर्ण झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची ही कार्यालयीन इमारत बाजार समितीच्या स्वनिधीतून उभारण्यात आली आहे. लवकरच मावळातील इतर ग्रामीण भागात उपकार्यालय सुरू करण्याचा मानस संचालकांनी व्यक्त केला आहे. सध्या तालुक्यातील शिवणे व वडेश्वर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आठवडे बाजार सुरू करण्यात आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी