मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज बुधवार रोजी (दिनांक 2 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास एक अपघात घडला. पण या अपघाताने यंत्रणांसह सर्वांचीच कोंडी झाली. ह्याचे कारण एक भलामोठा कंटेनर द्रुतगती मार्गावर बोरघाटाजवळील खंडाळा बोगद्यातच पलटी होऊन आडवा झाला होता. मुंबई मार्गावर बोगद्यात हा अपघात झाल्याने संपूर्ण रस्ताच काहीकाळासाठी ब्लॉक झाला होता. ( Container Accident In Khandala Tunnel on Mumbai Pune expressway )
सदरच्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबी आणि बचाव यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. संबंधित यंत्रणांनाही उलट्या दिशेने घटनास्थळी जावे लागले. वाहनांच्या रांगा वाढत चालल्या होत्या. त्यामुळे यंत्रणांनी वेगाने काम करत कंटेनर मुख्य मार्गिकेवरुन बाजूला सारला आणि वाहतूक सुरु केली. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सध्या लोणावळा-खंडाळा भागात पावासाचा जोर आहे. अशात डोंगर माथ्यांवरुन पाण्याचे ओहोळ वाहत आहेत. खंडाळा बोगद्यातील मार्गही सततच्या पाण्यामुळे काहीसा निसरडा बनल्याचे दिसत आहे. अशात भरधाव वेगातील कंटेनर किंचित वळण असलेल्या ह्या बोगद्यात घसरुन पलटी होत आडवा झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. परंतू बचाव यंत्रणांची धावपळ आणि द्रुतगती मार्गवरील वाहनांची कोंडी मात्र नक्कीच झाली. ( Container Accident In Khandala Tunnel on Mumbai Pune expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme
– मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’