सध्या गावोगावी क्रिकेटच्या स्पर्धा होताना दिसतात. काही स्पॉन्सर्स जमा करुन गावात क्रिकेट टुर्नामेंट भरवण्यासाठी मंडळे सरसावलेली दिसतात. यातूनच गावोगावी क्रिकेटचे संघही तयार होतायेत. मात्र, नियमांची ऐशी की तैशी करत भरवल्या जाणाऱ्या या अशा क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान अपघात होणे आणि छोटे-मोठे वाद होणे आदी या गोष्टी सर्रास होताना दिसतात. परंतू, मावळ तालुक्यातील पुसाने गावात घडलेली घटना त्याहून गंभीर आहे. ( Controversy During Cricket Tournament Player Beaten By Six Others At Pusane Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुसाने येथे क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एकाला स्टम्प आणि बॅटने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (दिनांक 8 जानेवारी) रोजी ही घटना घडली. याप्रकरणी भरत किसन वाटाणे (वय 26. रा. ओवळे, मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी शशिकांत साठे, सागर साठे, शेखर साठे, लखन साठे, तेजस तावरे, राजू साठे (सर्व रा. ओवळे, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळे गावची प्रिमियर लिग स्पर्धेत प्रतापगड वॉरियर्स आणि राजगड वॉरियर्स यांच्यात मॅचदरम्यान फिर्यादी आणि आरोपी शशिकांत यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांना स्टम्प आणि बॅटने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून आरोपी राजू साठे याने इतर आरोपींना स्टॅम्प पुरवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक वाचा –
– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना
– वडगाव मावळमधील माळीनगर येथे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे लोकार्पण – Video