व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील पुसाने गावात क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान तुफान राडा, स्टम्प-बॅटने मारहाण

पुसाने येथे क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एकाला स्टम्प आणि बॅटने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल
Cricket

File Image


सध्या गावोगावी क्रिकेटच्या स्पर्धा होताना दिसतात. काही स्पॉन्सर्स जमा करुन गावात क्रिकेट टुर्नामेंट भरवण्यासाठी मंडळे सरसावलेली दिसतात. यातूनच गावोगावी क्रिकेटचे संघही तयार होतायेत. मात्र, नियमांची ऐशी की तैशी करत भरवल्या जाणाऱ्या या अशा क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान अपघात होणे आणि छोटे-मोठे वाद होणे आदी या गोष्टी सर्रास होताना दिसतात. परंतू, मावळ तालुक्यातील पुसाने गावात घडलेली घटना त्याहून गंभीर आहे. ( Controversy During Cricket Tournament Player Beaten By Six Others At Pusane Village Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुसाने येथे क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एकाला स्टम्प आणि बॅटने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (दिनांक 8 जानेवारी) रोजी ही घटना घडली. याप्रकरणी भरत किसन वाटाणे (वय 26. रा. ओवळे, मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी शशिकांत साठे, सागर साठे, शेखर साठे, लखन साठे, तेजस तावरे, राजू साठे (सर्व रा. ओवळे, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळे गावची प्रिमियर लिग स्पर्धेत प्रतापगड वॉरियर्स आणि राजगड वॉरियर्स यांच्यात मॅचदरम्यान फिर्यादी आणि आरोपी शशिकांत यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांना स्टम्प आणि बॅटने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून आरोपी राजू साठे याने इतर आरोपींना स्टॅम्प पुरवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अधिक वाचा –

– खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना
– वडगाव मावळमधील माळीनगर येथे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे लोकार्पण – Video


dainik maval jahirat

Previous Post

खळबळजनक! किरकोळ घरगुती वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, कामशेत येथील धक्कादायक घटना

Next Post

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Anniversary-of-Senior-Citizens-Friends-Association-Talegaon-Dabhade

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 29 वा वर्धापन दिन तळेगाव दाभाडे येथे उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.