व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा – खंडाळा येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याचे न्यायालयाचे आदेश । Lonavala News

न्यायालयाने लोणावळा, खंडाळ्यातील त्यांच्या अधिकारक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही परिषदेला दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Lonavla

File Image


Dainik Maval News : लोणावळा खंडाळा येथील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आणि सुधारण्यासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याचे, तसेच यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लोणावळा नगरपरिषद आणि राज्य सरकारला दिले. यामध्ये पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा व्यवस्था, देखभाल, दुरुस्ती आणि रस्त्यांचे रुंदीकरण आदींसह पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.

‘लोणावळा-खंडाळा सिटीझन फोरम’ने दाखल केलेल्या जनहित याचिका (पीआयएल) आणि इतरांनी दाखल केलेल्या अर्जांवर निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

“थंड हवेच्या ठिकाणी पर्यावरणीय संतुलन राखले पाहिजे आणि अनियंत्रित विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे ते नष्ट होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत. जर या भागाचे पर्यावरण संरक्षण केले नाही तर लोणावळा-खंडाळा भागात संपूर्ण आकर्षण नष्ट होईल,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

२००७ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेत लोणावळा-खंडाळा भागातील स्थानिक रहिवाशांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या भागातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि बांधकाम उपक्रमांचे नियमन करणे हा उद्देश होता, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

लोणावळा नगर परिषद त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशा बांधकामांची ओळख पटवून २७ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशानुसार तयार केलेल्या तक्रार निवारण यंत्रणेवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

उच्च न्यायालयाने असे आदेश दिले की, नगरपरिषदेने त्यांच्या तक्रार निवारण यंत्रणेची जाहिरात करावी आणि राज्यासह थंड हवेच्या जुळ्या शहरांसाठी नव्याने विकास नियंत्रण नियमावली तयार करावी, असे म्हटले.

लोणावळा नगर परिषदेसाठी नवीन विकास आराखडा तयार होईपर्यंत २०१४ मध्ये उच्च न्यायालय गठित तज्ञ समिती काम करेल. नवीन विकास आराखडा आणि नवीन विकास नियंत्रण नियमावली अंतिम करण्याच्या तारखेला तज्ज्ञ समिती बरखास्त होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

‘लोणावळा-खंडाळ्यास ‘हिल स्टेशन’चा दर्जा द्यावा’
लोणावळा व खंडाळा ही पर्यटनस्थळे जरी असली तरी त्यांना हिल स्टेशनचा दर्जा नाही. लोणावळा-खंडाळ्यासाठी विशेष नियम लागू करण्यासाठी या दोन्ही शहरांचा ‘हिल स्टेशन’च्या यादीत समावेश करण्याचा विचार राज्य सरकारला करता येईल. याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारकडे तशी मागणी करावी, असे न्यायालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची घोषणा ! तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरावर राबविणार अभियान
– ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे पाऊल ! महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी उभारणार ‘उमेद मॉल’
– अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता
– पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News


Previous Post

महसूल विभागाचा कारभार पारदर्शक होणार ; सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित नोंदी वेळेत मंजूर करण्यासाठी नियंत्रण कक्ष

Next Post

दैनिक मावळ विशेष : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rice-Cultivated-Maval

दैनिक मावळ विशेष : 'गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी' ... मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.