पवनमावळ भागातील धनगव्हाण गावातील शेतकरी लक्ष्मण नथू घारे यांच्या शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत एक गाई, एक बैलाचा होरपळून मृत्यु झाला आहे. तर तीन जनावरे होरपळून मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. यासह साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे. घारे याच्या शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुसकान झाले आहे. तर सर्जाराजाची जोडी तुटल्याने गरीब शेतकऱ्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
घारे यांनी सकाळी शेतावरील गोठ्यात पाच जनावरांना पाणी पाजून बांधून ठेवली होती. त्यानंतर इतर कामानिमित्त घारे बाहेरगावी आल्याने अचानक ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागली त्यावेळी त्या ठिकाणी घरातील कोणी नसल्याने जनावरांना जीव गमवावा लागला. यात वर्षाभरासाठी साठवून ठेवलेला चारा ही जळून खाक झाला आहे. (Cow and Bull Died in Cowshed Fire Dhangwan Village Maval Taluka)
जखमी पडलेल्या जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी यांनी औषधोपचार सुरु केला असून जनावरांना मोठ्या प्रमाणावर जखम झाली असल्याने युद्ध पातळीवर वैद्यकीय सेवा सुरु आहे. महसूल विभागाचे तलाठी सचिन जाधव आणि रामदास कदम यांनी याबाबत पंचनामा केला असुन पुढील कार्यवाही साठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. तरी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सर्जाराजाची तुटली जोडी –
घारे यांच्या कडे शेतीची कामे करण्यासाठी एकरंगी एक शिंगे बैलाची जोडी होती. पंरतु काल अचानक लागलेल्या आगिमुळे सर्जाराजा मधील एकाचा होरपळून मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्यावर औषधोपचार सुरू आहे. ऐन शेतीच्या कामामध्ये सर्जा राजाची जोडी तुटल्याने घारे कुंटब मोठ्या संकटात सापडले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांरी मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल, शरद पवार गटाचं काय झालं? वाचा सविस्तर
– निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या समस्या तातडीने सोडवा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश । Talegaon Dabhade