Dainik Maval News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. २ एप्रिल) मावळ तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी करत प्रतिकात्मक आंदोलन केले.
पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अपर्णा दराडे, बाळासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, श्रीरंग जाधव, बबन गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
राज्यात भोंदूबाबांचा वाढता सुळसुळाट, त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ आणि घरगुती गॅसच्या तुटवड्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. गॅस वितरक कार्यालयांसमोर लागणाऱ्या रांगांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब