राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार पद्मविभूषण शरद पवार ( Sharad Pawar ) आणि संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे ( Bapu Bhegade ) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इलेव्हन चॅलेंजर्स देहूरोड’ यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी चषक-2022’ या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी सदिच्छा भेट देऊन सहभागी क्रिकेट संघांना आणि खेळांडुना शुभेच्छा दिल्या. ( Cricket Tournament At Dehurod On Occasion Of NCP MP Sharad Pawar Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अतिशय उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडुंना देखील आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळत असते, असे मत आमदार शेळकेंनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शेळकेंसमवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, दिपक भोंडवे, देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे, प्रदेश सचिव प्रसाद लिमण, किशोर गाथाडे, धनंजय सावंत, तरलोचन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे..’ शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा
– मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली