Dainik Maval News : तुमच्या पतीचा खून झाला आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून एका महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना सोळा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी, नवलाख उंबरे येथे घडली.
याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. २६) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ९८६०८०१०८६ या मोबाइलवर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी या आपल्या घरी होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर अज्ञात आरोपीने फोन केला.
फिर्यादी यांचे पती पंडित रामचंद्र जाधव यांचा खून झाला असून तुमच्या आणि तुमच्या मुलाच्याही जीवाला धोका आहे, असे म्हणत फिर्यादी महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीस व फिर्यादीच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC