व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या मुंबईच्या दोन बुकींना लोणावळा परिसरातून अटक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावणाऱ्या मुंबईतील दोन बुकींसह पाच जणांना पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यावर सट्टा लावणाऱ्या मुंबईतील दोन बुकींसह पाच जणांना पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लोणावळा परीसरातील तुंगार्ली गावच्या हद्दीत बंगला भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये हा सट्टाबाजार सुरू होता.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे ग्रामीण एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय 27, क्लब व्यवसाय, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय 30, क्लब व्यवसाय रा पंजाबी कॉलनी, सायन कोळीवाडा) यांसह शषांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा) यांच्यावर भादवी कलम 420, 465, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4(अ), भारतीय टेलिग्राफ अँक्ट कलम 25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट संघादरम्यान खेळावर सट्टा लागणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असता, मुंबईतील दोन सट्टेबाजांनी लोणावळा परिसरात तुंगार्ली गावच्या हद्दीत भाडेतत्वावर बंगला घेतल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने निसर्ग बंगलो सोसायटीतील बंगला क्रमांक तीनवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 मोबाईल, लॅपटॉप साहित्यासह एकूण दीड लाख रूपयांचा ऐवज जप्त केला. लोणावळा पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’
– लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी


Previous Post

पुण्यात उबेरसह ‘या’ चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

Next Post

चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-police

चोरीला गेलेली 'लक्ष्मी' अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.