शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. यात मावळ तालुक्यातील लोणावळा येथील ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते, नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळ्यातील ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांची गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुखपदी महेश गोपाळ केदारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे मी त्यास 100 टक्के न्याय देईल. साहेबांचे आणि सर्व वरिष्ठांचे आभार, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर महेश केदारी यांनी दिली. ( Lonavla Shiv Sena Thackeray Group leader Mahesh Kedari appointed as Gadchiroli District Liaison Chief )
अधिक वाचा –
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी
– आंदर मावळ आणि नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी – आमदार सुनिल शेळके