वडगाव मावळ येथील जामा मस्जिद इथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दुपारी स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी इथे येत मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असल्याने या रमजानमध्ये महिनाभर कडक रोजे (उपवास) ठेवले जातात. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांशी गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात. शनिवारी वडगाव शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी जामा मस्जिद इथे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होत त्यांना शुभकामना दिल्या. ( Ramjan Eid 2023 Wishes from All Party Officials to Muslim Brothers at Jama Masjid in Vadgaon maval )
शनिवार (दिनांक 22 एप्रिल) रोजी रमजान ईद निमित्त आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव मावळ येथील जामा मस्जिद इथे जात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या या पवित्र दिवशी सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा, अशी प्रार्थना करुयात असे यावेळी शेळके म्हणाले. तसेच रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– लोणावळ्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते महेश केदारी यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
– हडपसरमधील 9 वर्षाच्या प्रणवने केलाय ‘हा’ खास विश्वविक्रम