Dainik Maval News : बंद खोलीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी (दि.१२) सोमाटणे गावच्या हद्दीत शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत असणाऱ्या एका गाळ्यात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मयुर विलास जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १. विक्रांत यशवंत गडकरी (वय ३५ वर्षे, रा. खळदेआळी, तळेगाव दाभाडे), २. अंकुश भिमराव पवार (वय ३४ वर्षे रा. रमाकांतनगर, तळेगाव दाभाडे), ३. सचिन भाउराम मेश्राम (वय ४० वर्षे रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) आणि ४. सोमनाथ पंढरीनाथ मुऱ्हे (वय ३८ वर्षे, रा. सोमाटणे गाव ता. मावळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुद वेळी, ठिकाणी आरोपी क्रमांक १ ते ४ हे कंम्प्युटरवर ‘फन टु प्ले’ नावाचा ऑनलाईन जुगार खेळत आणि खेळवत असताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व इतर मुद्देवाल असा ५२ हजार ३५५ रु. मुददेमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जगदाळे हे अधिक तपास करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
