Dainik Maval News : आमच्या मार्फत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ, असे आमिष दाखवून एका नागरिकाची १ कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑनलाईन पद्धतीने तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी एका नागरिकाने बुधवारी (दि.९) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारक व संबंधित बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 27 जानेवारी 2025 ते 9 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये तळेगाव येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या प्लॅटफॉर्म मार्फत गुंतवणूक केल्यास चांगल्या परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच सुरुवातीला किरकोळ स्वरूपात परतावा देऊन आणखीन विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ घेऊन ते पैसे परत न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates