चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी येथे बुधवार (दिनांक 6 सप्टेंबर) रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व रंगभूषा केल्या होत्या. छोट्या गटातील मुले कृष्ण व राधेच्या पारंपारिक वेशभूषेत आली होती आणि त्यांनी दहीहंडीचा व रास – गरब्याचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले देखावे. यामध्ये अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी अशा चार गटांनी प्रामुख्याने श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन, श्रीकृष्ण- सुदामा भेट व गोवर्धन पर्वत असे अप्रतिम देखावे सादर केले. यानंतर श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर व संस्थेच्या सचिव श्रीमती राधिका मॅम उपस्थित होत्या. ( dahihandi celebrated at Chaitanya International School Indori Maval )
श्रीकृष्णाची आरती आणि भजन यामुळे सर्व वातावरण कृष्णमय झाले होते. त्यानंतर शाळेच्या मैदानावर दहीहंडी बांधण्यात आली. विद्यालयातील चारही गटांनी क्रमाने दहीहंडी फोडली. संघटन उत्साह, उत्कंठा, थरार इत्यादी संमिश्र भावनांचा अनुभव उपस्थितितांनी अनुभवला. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम सम्पूर्ण झाला. प्राचार्या श्रीमती जेसी रॉय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे व नियोजनामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का
– कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून कांदा अनुदान वितरणाला सुरुवात, थेट खात्यात येणार पैसे
– ब्रेकिंग! ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे