चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी येथे मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर सर यांनी प्रार्थना सभेत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्व सांगून आपली गुरु शिष्य परंपरा किती प्राचीन आहे, या विषयावर प्रकाश टाकला.
आपल्या उद्बोधन पर भाषणामध्ये ते म्हणाले कि,’ समाज कितीही बदलला तरी शिक्षकाचे स्थान हे अबाधित आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकांकडून, निसर्गाकडून काही ना काही शिकत असतो. त्याबद्दल आपण सकारात्मक दृष्टिकोण ठेवला पाहिजे व नेहमी आनंदी राहिले पाहिजे’ असे मोलाचे मत त्यांनी मांडले. ( teachers day celebrated with enthusiasm at Chaitanya International School Indori Maval )
तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आखला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत या दिवसाचे औचित्य साधले. त्यांनी विविध विषयांचे पाठ सर्व वर्गावर घेतले त्यात साहिल रात्रे या विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक म्हणून गौरवान्वित केले गेले. शाळा सुटण्यापूर्वी एका छोट्याशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते प्राचार्य जेसी मॅम, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून कांदा अनुदान वितरणाला सुरुवात, थेट खात्यात येणार पैसे
– ब्रेकिंग! ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– वडगाव नगरपंचायतीला मिळाले नवे ‘कारभारी’, 5 वर्षांत 4 कारभारी