मराठा समाजाकडून आज ‘मावळ बंद’ – सकल मराठा समाज मावळ आणि मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने जालना सराटी इथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला आहे. तसेच आज, सोमवारी (दिनांक 4 सप्टेंबर) संपूर्ण ‘मावळ बंद’ची हाक देण्यात आली. सकल मराठा समाज मावळ यांच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. ( Maval bandh in protest of lathi charge on Maratha protesters )
सप्टेंबरची सुरुवात पावसाने, खरीप पिकांना जीवदान – मावळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने लपाछपीचा खेळ खेळल्यानंतर सप्टेंबरची सुरुवात जोरदार केली. त्यामुळे गरजेच्या वेळी पावसाचे पुनरागमन झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मावळ तालुक्याच्या पूर्व भागात भात लागवडी पूर्ण झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. पाण्याअभावी लागवड झालेली भात रोपे पिवळी पडू लागली होती. काही भागात करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. अशात सप्टेंबरचे पहिले तिनही दिवस पाऊस झाल्याने भातासह सर्व खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. ( September begins with rain, giving life to kharif crops )
तळेगाव दाभाडे शहरात दोन ठिकाणी घरफोडी – तळेगाव दाभाडे शहरातील यशवंतनगर परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दिनांक 31 ऑगस्ट) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार विजय जाधव (वय 23, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव पोलिस करत आहेत. ( Burglary at two places in Talegaon Dabhade city )
तालुक्यात 1 हजार मुलींचे HPV लसीकरण – मेधाविण फाऊंडेशन, सीपीएए यांच्या वतीने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत तळेगाव दाभाडे आणि पवन मावळ परिसरातील वेगवेगळ्या शाळांमधील सुमारे 1 हजार विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तसेच तळेगाव नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. बाजारात साडेतीन ते चार हजार किंमतीला मिळणारी ही लस शिबिरात मोफत देण्यात आली. ( HPV vaccination of 1 thousand girls )
( dainik maval bulletin read all important news of maval taluka in one click )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?
– ‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी
– ‘आपलं मत आजच ठरवा, भाजप-आरएसएसची सत्ता उलथवून टाका’, वाचा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर