पुणे शहर ( Pune City ) आणि जिल्ह्यात ( District ) गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर यांसह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांश धरणे फुल्ल ( Dams In Pune District Are full ) झाली आहेत. त्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग ( Water Released From Dam ) सुरु करण्यात आला आहे.
पाहा कोणत्या धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु…
पवना धरण : ( Pavana Dam )
पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे साेडण्यात येणारा विसर्ग 8600 क्युसेकवरून कमी करुन 6499 क्युसेस करण्यात येणार आहे आणि पावर आऊटलेट 1400 असा एकुण 8800 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पवना धरणाबाबत महत्वाची बातमी! नागरिकांना खास आवाहन
कासारसाई धरण : ( Kasarsai Dam )
शुक्रवारी दुपारी 2 वाजता कासारसाई मध्यम प्रकल्पातून कासारसाई नदी पात्रातून होत असलेला 900 क्युसेक एवढा विसर्ग वाढवून 1350 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे / कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
मुळशी धरण: ( Mulshi Dam )
शुक्रवारी दुपारी 2 वाजता धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 21220 वरून वाढवून 26400 क्युसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून 30000 ते 35000 क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात येईल.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खडकवासला धरण: ( Khadakwasla Dam )
शुक्रवारी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 19,289 क्युसेक विसर्ग वाढवून सायंकाळी 30,00 क्यूसेक करण्यात आला. आवश्यकतेनुसार 35000 देखील किंवा कमी / अधिक बदल संभवू शकतो.
चासकमान धरण : ( Chaskaman Dam )
चासकमान धरण 100 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुपारी दीड वाजता सांडव्याद्वारे 12650 क्युसेक विसर्ग भिमा नदीत सोडण्यात आला आहे. भविष्यात पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो.
( Dams In Pune District Are full Water Released From Dam )
अधिक वाचा –
महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या
Video : पुण्याजवळील या गावात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत
लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप