सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. अशात देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मावळ तालुक्यातील कार्ला येथील श्री एकविरा देवी आईचे दर्शन घेण्यासाठी राज्य देशभरातून भाविकभक्त येत असतात. शारदीय नवरात्रोत्सव काळात कार्ला गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांती संख्या ही मोठी असते, यंदाही गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुरवरून येणाऱ्या भाविकांना एकविरा मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी शनिवार, रविवार 24 तास देवीचे दर्शन सुरु ठेवण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.
कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचे मंदिर शनिवार, दि. 21 ऑक्टोबर आणि रविवारी दि. 22 ऑक्टोबर हे 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. शारदीय नवरात्र उत्सवाचे आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. अशात सुट्ट्यांमुळे या दोन दिवसांत गडावर भाविकांची मोठी गर्दी होेण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, दर्शन सुलभ व्हावे आणि सर्वांना व्हावे, यासाठी हाव निर्णय घेण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भाविकांनी देखील दर्शन घेतल्यानंतर गडावर जास्तवेळ थांबू नये, अनावश्यक गर्दी करु नये, रांगेत आणि शिस्तीत दर्शन घ्यावे, ज्येष्ठ नागरिक, महिला – बालकांची काळजी घ्यावी, ट्रस्टच्या आणि उत्सव समितीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या गडावर भाविकांच्या सुरक्षिततेकरीता गडावर आणि पायथ्याजवळ 24 तास पोलीस यंत्रणा तैनात आहे. ( Darshan of Karla Ekvira Devi will continue for 24 hours )
अधिक वाचा –
– सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
– मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन