Dainik Maval News : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवार कंबर कसून कामाला लागले आहेत. पक्षाच्या नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळालेल्या उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि जनसंपर्क वाढविणे यावर भर दिला जात आहे. काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा मतदारसंघात होत आहे. श्री. गुंड यांचा सध्या गावभेट दौरा सुरू असून काले-कुसगांव गटातील काले गणात त्यांच्या गावभेट संवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन गावातील सर्वांशी आपुलकीने संवाद साधण्यासोबतच भाऊसाहेब गुंड यांच्याकडून स्थानिक समस्यांचा आढावा घेतला जात आहे. तसेच ग्रामस्थांच्या एकजुटीने स्थानिक समस्या सोडविण्यासाठीचे धोरण निश्चित केले जात असून दुरदृष्टी ठेवून समाजकारण करणारे नेतृत्व म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाला नागरिकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
नुकताच ( दि. १ डिसेंबर ) भाऊसाहेब गुंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत काले – कुसगांव गटातील काले गणात गावभेट – संवाद दौरा केला. यामध्ये त्यांनी प्रभाचीवाडी, सावंतवाडी, महागाव, निकमवाडी, दत्तवाडी, काले आणि पवनानगर बाजारपेठ भागात भेट दिली. याप्रसंगी सर्वच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी श्री. गुंड यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. तसेच महिला भगिनींने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. प्रत्येक गावात ग्रामदैवताचे दर्शन घेऊन गुंड यांनी स्थानिकांसोबत संवाद साधला.
प्रत्यक्ष लोकसंवादाद्वारे विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी हा दौरा आयोजित केला असून नागरिकांचाही सकारात्मक पाठींबा मिळत असल्याचे दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले. श्री. गुंड यांचा हा दौरा त्यांची जनसंपर्काची नाळ अधिक घट्ट करीत असून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटातून भाजपाचे प्रभावी व सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची आता सर्वाधिक चर्चा होत आहे. तसेच नागरिकांचाही त्यांच्या उमेदवारीला पाठींबा मिळत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात

