राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर हौते. यावेळी त्यांच्या हस्ते, तसेच पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अनेक विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्राधिकरण निगडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण सोमवार (दिनांक 16 मे) रोजी करण्यात आले. तसेच विविध विकास प्रकल्पांचे ऑनलाईन भूमिपूजन आणि विविध योजनांचे लोकार्पण केले गेले. ( DCM Devendra Fadnavis Inaugurat GD Madgulkar Theater And 3D Planetarium In Pimpri Chinchwad City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन नाट्यगृहामुळे पिंपरी-चिंचवडमधील नाट्यरसिकांसाठी एक कलाक्षेत्राचं भव्य दालनच खुलं झालं आहे. या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच विविध प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी हातभार लागणार आहे.
????1.45 pm????Akurdi, Pune | दु. १.४५वा ???? आकुर्डी, पुणे
????Inauguration of various development works for Pimpri-Chinchwad and G.D Madgulkar Theatre
????ग. दि.माडगूळकर नाट्यग्रह का उदघाटन एवं पिंपरी चिंचवड के विभिन्न विकास परियोजनाओं का उद्घाटन और भूमिपूजन
????ग. दि.माडगूळकर नाट्यगृहाचे… pic.twitter.com/Ze7C687DPW— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 15, 2023
यावेळी मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, भाजपा अध्यक्ष व भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे, चिंचवड विधानसभा प्रमुख शंकरशेठ जगताप, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पी एम आर डी ए आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग, मा नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्या 3D तारांगणाचे उद्घाटन –
विज्ञान आणि तंत्रज्ञान हा नेहमीच भारताच्या प्रगतीचा महत्वाचा भाग राहिला आहे. त्याच प्रेरणेतून पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 3D तारांगणाचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचा –
– चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन । Pimpri Chinchwad News
– छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी ‘श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा’, देवदर्शन यात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम