संत-महात्म्यांच्या विचारांवर चालणारा तालुका म्हणून मावळ चा ( Maval Taluka ) उल्लेख होतो. संत-महात्म्यांनी आपल्याला भूतदयेची शिकवण दिली आहे. मात्र, त्यांच्या या शिकवणीचा विसर आता लोकांना होताना दिसत आहे. प्राणीमात्रांवर दया दाखवणे तर दुरच पण त्यांच्याबद्दल मनुष्य अधिकाधिक क्रुर होताना दिसत आहे. यातूनच कधी प्राण्याचे हाल करणे किंवा त्यांना जीवे मारण्याचे प्रकार घडतात. लोणावळा ( Lonavla City ) शहरात अशीच एक क्रुर घटना घडल्याचे समोर आले आहे.
लोणावळा शहरात भटक्या श्वानांना ( Death Of Stray Dog ) दांडक्याने जबर मारहाण ( Stray Dog Beating ) केल्याची घटना घडलीये. याप्रकरणी प्रियंका व्हिस्पी बालापोरीया ( वय 31, रा. स्वारंग सोसायटी गोल्ड हॅली सेक्टर, डी न्यू तुंगार्ली, लोणावळा) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात ( Four People ) गुन्हा दाखल ( Case Registered ) करण्यात आलाय.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नितीन विदप्पा आहिरे, राजेष गणेश आचार्य, संजय वासु आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी, गोल्ड व्हॅली सेक्टर, डी. न्यु तुंगार्ली, लोणावळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – मावळ तालुक्यात पसरतोय हा भयंकर आजार, शेतकरी प्रचंड चिंतेत, उर्से गावात कहर
पोलिसांनी ( Lonavla Police ) दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व आरोपींनी संगनमत करून काहीएक कारण नसताना काही भटक्या जातीच्या श्वांनाना लाकडी दांडक्याचे साहयाने बेदम मारहाण केली. त्यापैकी एका श्वानाचा मृत्यू झाला, असे बालापोरिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिस पुढील तपास करत आहेत. ( Death Of Stray Dog After Beating By Four People In Lonavala Case Registered )
अधिक वाचा –
महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या
व्हिडिओ: गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुण्यात कौतुकास्पद उपक्रम