पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसला किरकोळ आग लागली. मात्र, आगीच्या धुरामुळे रेल्वे प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. चालकाने रेल्वे थांबवल्यानंतर प्रवाशांनी पटापट एक्सप्रेसमधून बाहेर उड्या घेतल्याचे दिसून आले. ( Deccan Queen Express Minor Fire Near Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नेमके काय झाले?
पुण्याहून निघणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही लोणावळा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर गेली असताना, महिलांच्या डब्याच्या ब्रेक पॅडला किरकोळ आग लागल्याचे दिसून आले. त्यानंतर गाडी थांबवण्यात आली. गाडी थांबताच महिलांनी तो डबा तातडीने खाली केला. त्यानंतर मोटरमन यांनी याची पाहणी करून काही वेळ एक्सप्रेस थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन ही काहीशा उशिराने मुंबईला पोहोचली.
अधिक वाचा –
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याचा दीड वर्षांनी खून, पुण्यातील घटना
दारू पिली आणि पाण्याची बाटली डोक्यात गेली, थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन पोलिसांना केला फोन, प्रकरण वाचून शॉक व्हाल