उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत. सुर्याच्या किरणांचा दाह वाढू लागला आहे. या कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवनही जोरात होऊ लागले आहे. मावळ तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरण जलाशयातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. कडक उन्हामुळे तालुक्यातील अनेक धरणांचा जलसाठा घटला आहे, त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. सद्यमितीस तालुक्यातील आंद्रा धरणात 65.13 टक्के, वडिवळे 71.23 टक्के तर पवना धरणामध्ये 56 टक्के पाणीसाठा राहिला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी ही धरणे शेती, उद्योगधंदे आणि नागरिकांच्या पाण्यासाठी प्रमुख स्त्रोत आहेत. मावळ तालुक्यातील नद्या या हंगामी असल्याने आणि तळे-तलाव यांची संख्या नगण्य असल्याने धरणातील जलसाठ्यावर बहुतांशी जनता अवलंबून आहे. पवना धरण हे तालुक्यातील सर्वात मोठे असून त्यातून पिंपरी-चिंचवड शहर, देहूरोड, तळेगाव आणि मावळातील औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा होते. तसेच तालुक्यातील पाच पन्नास गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत, सध्या पवना धरणात सर्वात कमी 56 टक्के पाणी साठा आहे. मावळातील एकूण धरणांपैकी वडीवळे धरणामध्ये सर्वाधिक म्हणजे 71 टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल आंद्रा धरणात 65 टक्के पाणीसाठा आहे. ( Decrease in water storage in dams in Maval taluka due to hot summer )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने सर्वजण थक्क
– राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 21 हजार कोटी वितरित । PM Kisan Yojana